आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा सेना नेते मानेंच्या चालकाकडे देशी कट्टा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज / औरंगाबाद - युवा सेनेचे जिल्हाधिकारी संतोष माने यांचा वाहनचालक काकासाहेब शिंदे (रा. कानगाव, ता. गंगापूर) याला गावठी कट्टा विकणाऱ्या विजय शांतीलाल गांधी यास वाळूज पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे नऊ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अहमदनगर येथे गावठी कट्टे विकण्यासाठी गांधी आला असताना तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
काही दिवसांपूर्वी वाळूज महानगरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या काही संशयित व्यक्तींना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडे गावठी कट्टा सापडला होता. मात्र त्याची काडतुसे मुन्ना नावाच्या व्यक्तीकडे असून तो फरार आहे असे अटकेतील आरोपींनी सांगितले होते. मुन्नाला वाळूज पोलिसांनी अहमदाबाद (गुजरात) येथून अटक केली. त्याने ही बंदूक विजय शांतीलाल गांधी (३४, रा. सर्व्हे नं. १२, सुखसागरनगर, कात्रज, पुणे) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिस गांधीच्या मागावर होते.तो अहमदनगर येथे गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची विचारपूस केली असता त्याने ११ मार्च २०१५ रोजी वाळूज येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला आणि युवा सेनेचे जिल्हाधिकारी संतोष माने यांचा चालक काकाकसाहेब याला एक कट्टा विकल्याची कबुली दिली.
विजय गांधी हा मध्य प्रदेशातून गावठी कट्टे आणत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी दिली. त्याच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने आणखी किती गावठी कट्टे विकले आहेत, याबाबतची माहिती लवकरच समोर येईल, असे फौजदार वसंत शेळके यांनी सांगितले. ही कारवाई उपनिरीक्षक संजय अहिरे, अजयकुमार पांडे, पोलिस शिपाई अमोल शिंदे, बाबासाहेब काकडे, रमेश सांगळे यांनी केली.