आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्य नागरिकांच्या घरांवर आरक्षण; सातारा परिसरात खळबळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नगर रचना विभागाने नुकत्याच तयार केलेल्या व सिडकोने प्रसिद्धीस दिलेल्या 28 गाव झालरक्षेत्र योजनेच्या प्रारूप आराखड्यामुळे सातारा परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. धनदांडग्यांच्या मालमत्ता वाचविण्यासाठी सामान्यांच्या राहत्या घरांवर आरक्षणे टाकण्यात आल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत.

सातारा परिसरातील गट नं. 159 मध्ये सध्या 20 फुटांचा अंतर्गत रस्ता आहे. प्रारूप आराखड्यात 50 फुटांचा रस्ता आणि रस्त्यालगतच्या सर्वाजनिक वापरांच्या जागांवर आरक्षण टाकण्यात आलेले आहे. रस्त्यासाठी मोकळ्या जागा सोडून त्याला लागून असलेल्या इमारतीवर आरक्षण टाकले गेले आहे. धनदांडग्यांच्या मालमत्ता वाचविण्यासाठीच हा उद्योग करण्यात आला आहे. आराखड्यात याच गटापासून तीनशे मीटरच्या अंतरावरून शंभर फूट आणि पन्नास फुटांचे दोन मोठे रस्ते समांतर रेषेत जात आहेत. असे असताना त्यालगत पुन्हा समांतर रेषेत तिसर्‍या एवढय़ा रस्त्याची आवश्यकता आहे काय असा प्रश्न नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी सिडकोने तयार केलेल्या प्रारूप आराखड्यात येथील मालमत्तांवर कुठल्याच प्रकारचे आरक्षण नव्हते. नगर रचना विभागाच्या वतीने तयार केलेल्या आराखड्यात मात्र आरक्षण टाकण्यात आल्याचे सांगितले आहे.

उपरोक्त आरक्षण रद्द करण्याची मागणी प्रसाद देशपांडे, रमेश कुलकर्णी, मधुकर जोशी, संजय कुलकर्णी, दीनदयाल निषाद, संदीप कुलकर्णी, गणेश शेरकर, परशुराम चौधरी, अनिल कुलकर्णी, महेंद्र देशमुख, राजेंद्र देशमुख, अमर पुरवार, संदीप बोठे यांनी केले आहे.