आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक कमी झाल्याने झेंडूची फुले महागली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नवरात्र महोत्सव आणि विजयादशमिनित्त फुलांची मागणी वाढली असून आवक कमी झाल्याने पंधरा दिवसांपूर्वी 50 रुपये भाव असलेल्या झेंडूच्या फुलांत दहा रुपयांनी वाढ झाली आहे. यंदा मान्सून चांगला झाल्यामुळे फुलशेती बहरली खरी, पण परतीच्या मुसळधार पावसाने फुलांची नासाडी झाली.

समितीत फुलांची आवक नाही
जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत अद्याप फुलांची आवक नसल्याचे अधिकारी सांगतात, पण सिटी चौकातील बाजारपेठेत दररोज मुंबई, पुणे, अहमदनगर, शिर्डी, नांदेड, मुदखेड, जालना, सातवाणी (परभणी), औरंगाबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, हसरूल, सावंगी, बिडकीन, पानरांजणगाव आदी भागांतून फुलांची आवक होते. बाजारपेठेत झेंडूची फुले 3 हजार ते 3500 रुपये क्विंटलने विक्री होत आहेत, पण किरकोळ बाजारात झेंडूला 50 ते 60 रुपये किलोमागे भाव मिळत आहे.

आवकनुसार भाव
बाजारात दररोज फुलांच्या भावात चढउतार होत असतो. दसर्‍याच्या दिवशी आवक किती होते त्यावर फुलांचे भाव ठरतील. सध्या झेंडूला 50 ते 60 रुपये भाव आहे. नासेर पठाण, किरकोळ फूल विक्रेता