आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद गट, पंचायत समितीची गण रचना जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापूर तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने वाळूज भागातील जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणांच्या प्रभागांची नव्याने रचना केली. लोकसंख्या वाढीमुळे त्यात अनेक जि. प. गट पंचायत समिती गण इतर प्रभागांना जोडली गेली आहेत.

पंधरवड्यापूर्वी गंगापूर तालुक्यातील जि. प. गट पंचायत समिती गणांची लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग रचना करण्यात आली. ऑक्टोबर रोजी जि. प. गट पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडती काढल्या जातील.

जिल्हा परिषदेचा वाळूज गट : वाळूजखुर्द, नायगाव, शिवराई, नारायणपूर बुद्रूक, रहिमपूर, लांझी, हिरापूर, महंमदपूर, मेंदीपूर, पिंपरखेडा अब्दुलपूर.
लिंबेजळगावगण : नायगाव,शिवराई, नारायणपूर बुद्रूक, रहीमपूर, लांझी, हिरापूर, महंमदपूर, मेंदीपूर, पिंपरखेडा अब्दुलपूर.

वाळूज गण : वाळूज गाव.
जिल्हा परिषदेचा रांजणगाव शेणपुंजी गट : रांजणगाव शेणपुंजी
जोगेश्वरी गण : जोगेश्वरी,रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीचा प्रभाग एक कमलापूर.
रांजणगाव शेणपुंजी गण : रांजणगावशेणपुंजी ग्रामपंचायतीचे प्रभाग ४, ६.
जिल्हा परिषदेचा शेंदुरवादा गट : औरंगपूर, नागापूर, शेंदुरवादा, शिवपूर, हर्सुली, मांडवा, पांढरवळ, तांदूळवाडी, सुलतानपूर, सावखेडा, नर्सिंगपूर, महालक्ष्मीखेडा, वझर, देव करवाडी, मांगेगाव, शंकरपूर, बोरुडी, तळपिंप्री, कोंडापूर, झांजर्डी, हमजाबाद.
गुरुधानोरा गण : गुरुधानोरा, धामोरी, मुर्शिदाबाद, सुलतानपूर, नंद्राबाद, कदीम शहापूर, ढोरेगाव, मुरमी, दहेगाव, सारंगपूर, मिरजापूर, सुलतानपूर, अंतापूर, चंडिकापूर, जिकठाण, टेंभापुरी, पेंडापूर, पदमपूर, भोयेगाव, नारायणपूर, कोबापूर.
बातम्या आणखी आहेत...