आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि. प. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतल्या सहाशे शाळा दत्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यातील ६०० शाळांचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी जि. प. तील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या शाळा दत्तक घेतल्या आहेत. महिन्यातील एक दिवस परिपाठ घेतला जाणार असून शालेय पोषण आहारावरही लक्ष ठेवले जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा अभिनव निर्णय घेण्यात आला.

बुधवारपासून शाळा नियमित सुरू होत आहे. सर्व शिक्षण अभियानामार्फत ते पर्यंत जि. प., मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश आणि शालेय पोषण आहार मोफत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक दिले जात आहेत. शैक्षणिक कामात अधिक पारदर्शकता यावी, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, पोषण आहार मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा दृष्टीने जि.प. अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहाशे शाळा दत्तक घेऊन वर्षभर अभियान राबवण्याचा संकल्प केला आहे.

सीईओ चौधरींनी घेतले ताजनापूर
पहिल्यादिवसापासून शिक्षक आपली कामगिरी चोख बजावणार आहेत. डॉ. चौधरी यांनी स्वत: ताजनापूर गाव दत्तक घेतले आहे. ११ विभागप्रमुख आदर्श ग्राम दत्तक घेणार आहेत. अधिकारी कर्मचारी एक-एक शाळा घेऊन वर्षातून दहा भेटी देणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...