आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणिसंग्रहालयाच्या जागेबाबत पालिकेची उदासीनता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लष्कराच्या अँम्युनेशन डेपोबरोबरच पालिकेला प्राणिसंग्रहालयासाठी 100 एकर जागा देण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली होती. लष्कराच्या जागेची मोजणी लगेचच झाली, पण पालिकेने साधी मागणीही न केल्यामुळे पालिकेच्या जागेची मोजणी होऊ शकलेली नाही.

जिल्हाधिकार्‍यांसमोर झालेल्या बैठकीत प्राणिसंग्रहालयाची जागा मोजून देण्याचे ठरले होते, पण नंतर त्यांच्याकडून पत्र आलेच नाही. मोजणीची रक्कमही भरण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही मोजणी कशी करणार, असे भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक एस. सय्यद यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे आम्हाला त्यांच्याकडून कोणतेही पत्र आले नाही. त्यामुळे आम्ही मोजणीचे पैसे कसे भरणार, असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. भगवान नाईकवाडे यांनी सांगितले.

संग्रहालयाला जागा हवी असल्यामुळे पालिकेने मोजणीसाठी लेखी पत्र देण्याची गरज होती. त्यानंतर शुल्क भरून तातडीने मोजणी करून देण्याची भूमी अभिलेख विभागाची तयारी आहे. मात्र, आयतीच जमीन मिळावी, अशी पालिकेची इच्छा असावी. त्यामुळे त्यांनी कोणताही पत्रव्यवहार केला नाही.

पत्र मिळताच मोजणी
जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत लष्कराबरोबरच पालिकेला ही जमीन मोजून देण्याचे ठरले होते. मात्र त्यानंतर मोजणी करून द्या असे पत्रच नाही तर मोजणी शुल्काची मागणी कशी करणार. त्यांनी पत्र द्यावे आम्ही लगेच मोजणी करून देतो. एस. सय्यद, अधीक्षक, भूमिअभिलेख.

प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे
मोजणी शुल्क भरण्याबाबत कळवलेच नाही. आम्हाला जमीन हवी याचा प्रस्ताव पूर्वीच जिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात आला आहे. पत्र आल्यास लगेच मोजणी शुल्क भरू. डॉ. भगवान नाईकवाडे, संचालक, प्राणिसंग्रहालय.