आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Zp Aurangabad Ex President Nahidabano Court Contro

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वकील बदलला म्हणून न्यायदानावर परिणाम नाही, नाहिदाबानोंना खंडपीठाने फटकारले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वकील बदलल्याने न्यायदानाच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही, अशा कठोर शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी नाहिदाबानो पठाण यांना फटकारले. जात वैधता प्रमाणपत्रावरून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद गमावलेल्या नाहिदाबानो यांनी विभागीय आयुक्तांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपद व सदस्यपद रिक्त ठेवण्याच्या निर्णयाला वकील बदलून आव्हान दिले होते. त्यांच्या या भूमिकेवर खंडपीठाने तीव्र नापसंती व्यक्त केली.

नाहिदाबानो पठाण यांचे जात वैधता प्रमाणापत्र पडताळणी समितीने 19 जुलै रोजी अवैध ठरवले आहे. हे प्रमाणपत्र खंडपीठानेच फेरपडताळणीसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठवले होते. समितीच्या निर्णयाविरुद्ध पठाण यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. वैधता प्रमाणपत्र समितीचा जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय स्थगित करण्यात यावा, अशी विनंती खंडपीठाला याचिकेद्वारे 25 जुलै रोजी केली. याचिकेच्या प्राथमिक सुनावणीत खंडपीठाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावून पुढील सुनावणी 7 ऑगस्टला ठेवली.

खंडपीठाची तीव्र नापसंती

पठाण यांच्या वकील बदलण्याच्या निर्णयावर खंडपीठाने तीव्र नापसंती व्यक्त केली. याचिकेवर 25 जुलैला सुनावणी झाल्यावर पुढील सुनावणी 7 ऑगस्टला ठेवण्यात आली होती. जात वैधता समितीच्या निर्णयास स्थगिती देण्यास खंडपीठाने नकार दिला होता. खंडपीठाचे आदेश कारणमीमांसेसह हवे असतील तर स्थगितीस नकार देण्याची कारणे नोंदवून आदेश देण्याचेही खंडपीठाच्या वतीने स्पष्ट क रण्यात आले होते. असे असताना याचिकाकर्त्याच्या त्या वेळच्या वकिलांनी कारणासह आदेश देऊ नये, अशी विनंती खंडपीठास केली होती. नाहिदाबानो यांनी वकील बदलून याचिका दाखल केल्याने पूर्वीच्या वकिलाने माघार घेण्याची परवानगी मागितली. खंडपीठाने वकील बदलण्याची परवानगीही दिली.