आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Zp Education Department School Uniform Issue Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जि.प. शिक्षण विभागाचेही गणित कच्चे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचेच नव्हे, तर जि. प. शिक्षण विभागाचेही गणित कच्चे आहे. या विभागाला शाळांतील विद्यार्थ्यांची संख्याही माहीत नसल्याचे त्यांच्या गणवेशाचे कोणतेच नियोजन करण्यात आले नाही. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देणे अपेक्षित असताना स्वातंत्र्य दिन तोंडावर आला तरी गणवेश मिळण्यात अडचणी आहेत. मात्र, 15 ऑगस्टपूर्वीच गणवेश दिले जातील, असा दावा शिक्षण विभाग करीत आहे.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून गणवेश दिले जातात. पहिली ते आठवीतील सर्व मुली आणि अनुसूचित जाती, जमाती, दारिद्रय़रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश दिले जातात. त्यासाठी सर्व शिक्षा अभियान, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून दिला जातो. शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होताच विद्यार्थ्यांची संख्या शिक्षण विभागाला गट शिक्षण अधिकार्‍यांकडून देण्यात येते. त्यामुळे स्वातंत्र्य दिनापर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळत होते. यंदा मात्र पात्र विद्यार्थ्यांची संख्याच गट शिक्षणाधिकार्‍यांनी जि. प. शिक्षण विभागाला दिली नाही. त्यामुळे प्रशासनानेही कोणतेच नियोजन केले नाही.

शिक्षण विभागानेही तसे प्रयत्न केले नसले तरी, सर्व शिक्षा अभियानाला प्राप्त झालेल्या दोन कोटी 18 लाख 40 हजार रुपयांच्या निधीतून 54 हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

मोजक्याच विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
शिक्षण विभागाच्या गणवेश वाटपाचा मुहूर्त कधी लागेल, याची शाश्वती नसली तरी, सर्व शिक्षा अभियानाच्या वतीने 54 हजार 600 विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहेत. त्यासाठी दोन कोटी 18 लाख 40 हजार रुपयांचा निधी शालेय स्तरावर पोहोचला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी काही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले आहेत. शिक्षण विभागाच्या योजनेतून केवळ दोन लाख 64 हजार रुपये वितरित करण्यात आले असून यातून किती विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील याची शाश्वती नाही.