आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत आज ठरणार जिल्हा परिषदेचा कारभारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड रविवारी करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्तेतील चौथा, तर आतापर्यंतचा २८वा अध्यक्ष रविवारी ठरेल.

अडीच वर्षे आघाडी आणि मनसेची सत्ता जि.प.मध्ये होती. यात सुरुवातीला नाहिदाबानो पठाण दीड वर्षे अध्यक्षा राहिल्या. त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले. प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्षा विजया चिकटगावकर यांनी दोन महिने कामकाज पाहिले. त्यानंतर सध्या शारदा जारवाल या अध्यक्षा होत्या. त्यांचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक होत आहे. रविवारी चार वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. सकाळी ११ ते एक नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाईल. दुपारी ३.१० वाजता अर्ज छाननी व नामनिर्देशन पत्र परत घेणे. दुपारी ३.१० ते निवड होईपर्यंत प्रत्यक्ष सभागृहात सभा घेऊन हात उंचावून मतदान घेण्यात येईल. निवडणुकीला पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विक्रम कुमार राहतील. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके या वेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, रात्री उशिरा मनसेने आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याने आघाडीचे पारडे जड झाले आहे.