आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zp Election Issue At Aurangabad, Abdul Sattar Paling Politics At Aurangabad

जिल्हा परिषदेत घडणार चमत्कार ? मनसेचे पाच सदस्य मुंबईत अब्दुल सत्तारांच्या छत्रछायेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची निवड अवघ्या चार दिवसांवर आली असून यात सिल्लोड पंचायत समितीत आघाडीचे संख्याबळ जास्त असूनही तेथे भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. अशात जि.प.च्या निवडणुकीतही हा चमत्कार घडणार, अशी चर्चा आहे. त्यामुळे सदस्य पळवापळवी सुरू आहे. मनसेचे पाच सदस्य मंगळवारी मंत्रिमहोदयांच्या बंगल्यावर असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्‍हा परिषदेत आघाडी आणि मनसेची मिळून सत्ता असलेल्या मिनी मंत्रालयाचे राजकारण जोरदार तापत आहे. यात सदस्यांची पळवापळवी आणि टोकन देण्याच्या कारणावरून सत्तेचे चित्र बदलणार असल्याचे भाकीत राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून बोलले जात आहे. सध्या मनसे आणि आघाडीचे सदस्य सहलीला गेले आहेत. मात्र, ज्या दोन अपक्ष सदस्यांनी आघाडीला पाठिंबा दिला, अशा सदस्यांना सहलीवर नेले नसून त्यांनी आघाडीवर नाराजी व्यक्त केली. यात मनसेच्या वरिष्ठांना विचारात घेता काँग्रेसच्या नेत्यांनी मनसेचे पाच सदस्य परस्पर पळवल्याने मनसेने नाराजी व्यक्त केली आहे. सुरुवातीला कृष्णकुंजवरून नाशिकच्या धर्तीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेत सत्ता येणार असल्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आघाडीच्या पळवापळवीच्या धोरणामुळे मनसेच्या सदस्य नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मनसेचे गायब सदस्य मुंबईत
मनसेचेसहा दिवसांपासून गायब असलेले सदस्य मंगळवारी मुंबईत दुग्ध पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रछायेत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तिरुपतीच्या दर्शनासाठी गेलेले सदस्य थेट विमानाने मुंबईला पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. विमानतळाहून स्वागत करून परत फिरणाऱ्या काही सदस्यांनी पहिल्यांदाच विमानाने प्रवास केल्याचा आनंद दिवसभर त्यांच्या चेहऱ्यावर असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
सत्तांतराचे गणित
आघाडीनेअडीच वर्षांत पक्षातील सदस्यांना आपलेसे करून ठेवले नाही. त्यामुळे पक्षातील सदस्यांनी अनेकदा सभागृहात नाराजी व्यक्त केली होती. यामुळे चार सदस्य अनुपस्थित राहतील अथवा युतीला पाठिंबा देणार असल्याचा अंदाज आहे. दोन अपक्षांना डावलल्याने त्यांची नाराजी तसेच युतीच्या सदस्यांकडून नियमित बोलणी सुरू आहे. त्यात अध्यक्षपदाच्या उमेदवार आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांवरही पक्षातील सदस्यांकडूनच नाराजी व्यक्त करण्यात येते. ही नाराजी २१ सप्टेंबरला स्पष्ट केल्यास सत्तांतर होऊ शकते.