आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झेडपी :5 हजार मतदार यंदा वंचित राहणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदार याद्या अद्याप प्रसिद्ध झाल्या नाहीत. मात्र केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाच्या असमन्वयामुळे जिल्ह्यातील पाच हजार मतदारांची नावे यादीत समाविष्ट झालेली नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या अंतिम करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मतदारांचे अर्ज भरून घेण्यात आले. १० सप्टेंबरपर्यंत मतदार याद्या अंतिम करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मतदार यादी तयार करण्यासाठी सुरू असलेले सर्व्हर सप्टेंबर रोजी बंद करण्यात आले. सर्व्हर बंद करण्यात आल्याची माहिती राज्यातील उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आली. तोपर्यंत काही जिल्ह्यातील मतदार नोंदणीनंतर डाटा एंट्री करण्यात आली, तर काही जिल्ह्यांत डाटा एंट्रीअभावी मतदारांची नोंदणी करण्यात आली नाही.
१० सप्टेंबरची यादी ग्राह्य धरणार
औरंगाबाद जिल्ह्यात २७ हजार मतदारांनी नोंदणी केली. त्यापैकी २२ हजार मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली असून पाच हजार जणांची नावे यादीत नाहीत. त्यामुळे या मतदारांना अर्ज भरूनही मतदानापासून वंचित राहावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...