आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीसाठी मनसेचे 11 उमेदवार जाहीर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषदेत निवडून येण्याची क्षमता ठेवणा-यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचा दावा करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अकरा उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली. जि.प. अध्यक्षपदाची किल्ली मनसेकडे राहील, असा दावा करीत उर्वरित उमेदवार दोन दिवसांत जाहीर केले जातील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मनसेने पक्षात नव्याने येणा-यांना तसेच पदाधिका-यांच्या नातलगांना उमेदवारी देणार नसल्याची घोषणा केली होती.
मात्र, या घोषणेचा मनसेला विसर पडल्याचे आजची यादी बघून दिसून येते. भास्कर गाडेकर, दिलीप बनकर आणि डॉ.सुनील शिंदे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची नावे जाहीर केली. गाडेकर म्हणाले, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दिलेल्या अहवालातील उमेदवारांच्या नावाबाबत सविस्तर चर्चा केली. सादर केलेल्या यादीपैकी निवडून येण्याची क्षमता असलेल्या अकरा उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले. यामध्ये डॉ. सुनील शिंदे- पिंपळवाडी, विजय दाभाडे- भवन, सिल्लोड, दत्ता बडक- अंधारी, दिगंबर महाकाळ- भराडी, दीपाली मधुकर काळे-शिवना, छाया ज्ञानदेव ठेंग- महालगाव, कांताबाई गोरख तुपे- शिरूर, बबन अंबादास शिंदे- खंडाळा, राजेंद्र काळे- सोयगाव, भारती दिलीप बनकर- अंबेलोहळ, संतोष जगन्नाथ जाधव- सिल्लेगाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेने पहिल्या यादीत पक्षातील पदाधिका-यांसह महिलांनाही उमेदवारी देऊन पक्षाचे धोरण स्पष्ट केले असल्याचेही गाडेकर यांनी सांगितले.