आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघातात वाचल्यानंतर अभियंत्याची आत्महत्या, शहानूरवाडीतील बंगल्यात गळफास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दौलताबाद घाटात 200 फूट खोल दरीत शनिवारी कार कोसळून झालेल्या अपघातात बालंबाल बचावलेले जीवन प्राधिकरणातील निवृत्त अभियंता संजय सुरेश अंधारे (48) यांनी रविवारी पहाटे बेडरूममधील खिडकीला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अंधारे बराच काळ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात प्रतिनियुक्तीवर होते. सहा वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यानंतर कंत्राटदार म्हणून काम करत होते. जिल्हा परिषदेत असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. याबाबत मॅटमध्ये प्रकरण दाखल आहे.

शहानूरवाडीतील मयूरबन कॉलनीत अंधारे यांच्या दुमजली बंगल्यात तळमजल्यावर त्यांचे व्हिडिओकॉन कंपनीतील इंजिनिअर बंधू अजय राहतात. दुसरे बंधू सारंग पुणे येथे इंजिनिअर आहेत. अंधारे यांचा मुलगा चित्ताेडगड येथे आयआयटीला, तर मुलगी दहावीत आहे. बंगल्यातील वरच्या खोलीच्या खिडकीला ओढणी बांधून अंधारे यांनी आत्महत्या केली. सकाळी 8 वाजता ही बाब त्यांच्या पत्नीच्या लक्षात आली. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे नातलगांनी सांगितले.

अपघातातून बचावले : खुलताबादहून दर्शन घेऊन परतताना शनिवारी सकाळी 9 वाजता अंधारे यांची वॅगन आर कार (एमएच 20 बीवाय 107) दोनशे फूट खोल दरीत कोसळली. यात त्यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली होती. दौलताबाद पोलिस चौकीचे हेडकॉन्स्टेबल एम.एस. पवार यांनी त्यांना दरीतून बाहेर काढले. त्यानंतर दुसर्‍या वाहनाने ते परत आले होते.