आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जि. प. चा 21 कोटींचा निधी परत जाण्याची चिन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषदेला विविध योजनांतून 2012-13 आणि 2013-14 या वर्षातील 90 कोटी रुपयांचा निधी 31 मार्चपर्यंत खर्च करायचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, यातील 21 कोटी रुपये परत जाण्याची शक्यता आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी अखर्चित निधीच्या खर्चासाठी बैठक घेऊन पूर्ण निधी खर्च करण्याचे आदेश दिले.

विकासकामांसाठी आलेला निधी अखर्चित आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेत विशेष बैठकीचे आयोजन अध्यक्षा शारदा जारवाल यांच्या दालनात घेण्याचे ठरले होते. मात्र, अध्यक्षा व इतर कोणतेच पदाधिकारी उपस्थित नसल्याने सीईओंच्या दालनात बैठक घेण्यात आली. या वेळी 90 कोटी रुपये निधी अखर्चित असल्याचे स्पष्ट झाले. 90 पैकी 32 कोटी रुपये निधी 2012-13 या वर्षाचा आहे. हा निधी खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे शिक्षण विभागाचा सहा कोटी 30 लाख व आरोग्य विभागाचा सहा कोटी 28 लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला. सर्व निधी बांधकामांसाठी आलेला आहे. हा निधी कशाही पद्धतीने नियोजन करून इतरत्र वापरल्यास शेवटी दोन कोटी रुपये परत जाणार हे निश्चित आहे. उर्वरित 58 कोटी रुपये 2013-14 या वर्षातील असल्याने हा निधी वापरण्यास आणखी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. तसेच जबाबदार विभागप्रमुखांवर कारवाई करण्यात येणार असल्याची सक्त ताकीदच चौधरी यांनी दिली.