आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प.चा वरिष्ठ सहायक ‘एसीबी’च्या जाळ्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निलंबन कालावधी नियमित करून वेतन व भत्ते देण्याचे आदेश काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सहशिक्षकाकडे 17 हजारांची लाच मागणार्‍या वरिष्ठ सहायक किशोर रमेश निकम (42) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले.

लातूर जिल्ह्यातील उजनी येथील सहशिक्षक सोमनाथ शिवमूर्ती मुकडे (31) हे सध्या पैठण तालुक्यातील बालानगरमधील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. ते 15 जून 2011 ते 23 ऑगस्ट 2011 या कालावधीत निलंबित होते. निलंबनाच्या कालावधीतील वेतन व भत्त्याचे आदेश काढण्यासाठी निकमने 20 हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती 17 हजारांवर सौदा ठरला. मुकडे यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी निकम यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे आज दुपारी उपअधीक्षक सुरेश वानखेडे, पी. डी. शिकारे, रामनाथ चोपडे, निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, सुधाकर मोहिते, विक्रम देशमुख, दिलीप पाटील, सुनील फेपाळे, प्रमोद पाटील, हरिभाऊ कुर्‍हे, अजय आवले, सचिन शिंदे आणि मतीन शेख यांनी दुपारी मुकडे यांच्याकडून 17 हजार रुपये स्वीकारताना निकम याला जिल्हा परिषदेत रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.