आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना संकटातून सावरण्याची शक्ती मिळो; जि.प. अध्यक्षा डोणगावकर यांचे हनुमानाला साकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन- यावर्षी भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे, त्यांना संकटातून सावरण्याची शक्ती मिळो, असे साकडे जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर यांनी गवळी शिवरा येथील महारुद्र हनुमानाला घातले.  
 
श्रीश्रेत्र गवळीशिवरा येथे महारुद्र मारुती संस्थानच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महारुद्र मारुती मंदिरात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत महापूजा व आरती करण्यात आली. विशेष म्हणजे मंगळवार हा मारुतीचा जन्म दिवस असून हनुमान जयंतीच्या दिवशी हा वार तब्बल दहा-बारा वर्षांनंतर जुळून आला, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष सुखदेव गवळी यांनी दिली. 
 
पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत हनुमान जयंतीनिमित्ताने तब्बल दीड-दोन लाख भाविकांनी महारुद्र मारुतीचे दर्शन घेतले. याप्रसंगी औरंगाबादचे महापौर बापूसाहेब घडामोडे, माजी सभापती कृष्णा पाटील डोणगावकर, माजी सभापती संतोष पाटील जाधव, प्रशांत बनसोडे, रवींद्र बनसोडे, दादासाहेब जगताप, हिरामण शेठ, भागीनाथ नवपुते, सुधाकर नवपुते, परसराम नवपुते, पांडूशेठ नवपुते, त्र्यंबक लोंढे, महेंद्र पांडे, चंद्रकांत गवळी, सुनील केरेसह विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 
कार्यक्रम यशस्वितेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष सुखदेव गवळी, उपाध्यक्ष संताराम केरे, सचिव उत्तम मांडे, कोशाध्यक्ष लक्ष्मण फाळके, पाडुरंग केरे, मारुती गवळी, सुभाष केरे, रंगनाथ गवळी, विलास पांडे, पांडुरंग गवळी, अंबादास केरे आदी परिश्रम घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...