आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेत यंदाही भरली शाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गावातील शाळेत शिक्षक नसल्याच्या निषेधार्थ रांजणगाव शेणपुंजी येथील गावकर्‍यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत मध्ये शाळा भरवली. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून तत्काळ सहा शिक्षक प्रतिनियुक्ती देणार असल्याचे गावकर्‍यांना सांगितले.

रांजणगाव येथील शाळा सातवीपर्यंत असूनही तेथे गावकर्‍यांनी दोन वर्षांपूर्वी प्रशासनावर दबाव टाकून आठवीच्या वर्गाला तत्त्वत: मंजुरी मिळवून घेतली होती. त्यानंतर तेथे दहावी वर्गही सुरू करण्यात आला. तसेच तुकड्याही सुरू केल्या. मात्र तुकडीला मान्यता नसल्याने तेथे यावर्षी एकही शिक्षक देण्यात आला नव्हता. मात्र 675 विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे सांगत गावकर्‍यांनी सकाळीच बनकर यांच्या दालनाबाहेर चारशे विद्यार्थी आणून बसवले.

परिपाठही येथेच घेण्यात आला. त्याचे निवेदनही बनकर यांना देऊन चर्चा केली. या वेळी अशोक कानडे, शेख सिकंदर, सुभाष सोनवणे, दत्तू हिवराळे, अशोक जाधव यांची उपस्थिती होती.