आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 300 शिक्षकांची देयके पडून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तालुक्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांवर सुमारे 1230 शिक्षक कार्यरत आहेत. मे 2014 पासून सर्व शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीअंतर्गत ऑनलाइन काढण्यात येत आहे; परंतु सहा महिन्यांपूर्वीचे तीनशेहून अधिक शिक्षक आणि निमशिक्षकांचे वेतननिश्चिती, चट्टोपाध्याय फरकाची रक्कम तसेच अर्जित रजेची विविध पुरवणी देयके प्रलंबित आहेत. देयके निकाली काढण्यासाठी पं. स. शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेकडे ऑनलाइन बजेटची मागणी करणे गरजेचे आहे. अशा प्रकारची मागणी करण्यासंबंधी गटविकास अधिका-यांनी शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहेत; परंतु शिक्षण विभाग ऑनलाइन बजेट मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने शिक्षकांची हेळसांड होत आहे. याविरोधात शिक्षक समितीचे दिलीप ढाकणे, रंजित राठोड, ज्ञानेश्वर पठाडे, संतोष जाधव, बाबूलाल राठोड, बाबासाहेब सांगळे, विष्णू गाडेकर, शमीम सय्यद, विजय सालकर, भगवान राजपूत, राजेंद्र मुळे, रमेश परदेशी, पाशू शहा, अंकुश चव्हाण, रामू गायकवाड, भाऊसाहेब बोर्डे आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शासन निर्णय 11 मे 2011 नुसार तालुका स्तरावर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करताना शासनमान्य अथवा जिल्हा व राज्य स्तरावर काम करणा-या शिक्षकांच्या संघटनेच्या पदाधिका-यांना सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन प्रशासनास दिले आहे. या संबंधी पंचायत समितीने ऑनलाइन बजेटची मागणी करावी अशा सूचनाच जिल्हा परिषदेच्या वतीने पंचायत समितीला करण्यात आल्या आहेत. मात्र, सूचना करूनही पंचायत समिती शिक्षण विभाग अशी मागणी करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शिक्षक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.