आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयाच्या रांगेतील वादातून 12 वीच्या विद्यार्थ्यांवर तलवार हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- परीक्षांचे प्रवेशपत्र घेताना महाविद्यालयात रांगेत १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून बारावीच्या दोन विद्यार्थ्यांवर ५ जणांनी तलवार व चाकूने हल्ला केल्याची घटना  गुरुवारी दुपारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ घडली.  


प्रतीक श्रीहरी दोडके (१७, रा. अंकुशनगर) हा केएसके महाविद्यालयात १२ वीत शिकतो. ३१ जानेवारी रोजी महाविद्यालयात परीक्षेचे प्रवेशपत्र आणण्यासाठी तो गेला असता रांगेत उभे राहण्यावरून त्याचा मुन्ना दुधाळसोबत वाद हाेऊन हाणामारी  झाली होती. दरम्यान, गुरुवारी प्रतीक  मित्रासह दुचाकीवरून महाविद्यालयातून घरी जात असताना मुन्ना व त्याच्या साथीदारांनी त्यांचा  पाठलाग करत महिला महाविद्यालयाजवळ  दुचाकी अडवून पाच जणांनी प्रतीक व त्याचा मित्र उमेश पांढरे या दोघांवर तलवार  व चाकूनेवार केले. दोघांच्याही हातावर, पाठीवर यामुळे जखमा झाल्या आहेत. 

 

पाच जणांवर गुन्हा   
दरम्यान, घटनेनंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देत पाहणी केली. या प्रकरणी मुन्ना दुधाळ, भारत मनेरी, राजू दुधाळ, आकाश जाधव, सारंग चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...