आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेततळ्यात बुडून 2 शाळकरी मुलींचा मृत्यू; झरी येथील घटना, धुणे धुताना घडलेली घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- धुणे धुण्यासाठी झरी (ता.परभणी) गावापासून जवळ असलेल्या शेतातील  तळ्यावर गेलेल्या दोन शाळकरी मुलींचा तळ्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२७) दुपारी तीनच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणात पालकांनी साशंकता व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली असून रात्री उशिरापर्यंत परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी कोणतेही नोंद झालेली नव्हती.  


याबाबत माहिती अशी, तालुक्यातील झरी येथील भोईगल्लीत राहणाऱ्या शीतलकौर शेरसिंग बावरी( १२) ही इयत्ता सातवीत शिक्षण घेणारी व तिची नातेवाइक असलेली प्रियाकौर मंगलसिंग दुधानी(१३) ही इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी  शीतलकौरचा भाऊ व बहीण काजलकौर या दोघांना घेऊन मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास गावापासून साधारणतः अर्धा किमी अंतरावरील  मंगेश सावंत यांच्या शेतातील शेततळ्यावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणे धूत असताना बकेट पाण्यात पडल्याने ती पकडण्यासाठी वाकल्या असता दोघींचाही तोल जावून त्या तळ्यात पडल्या. त्या बाहेर येत नसल्याचे पाहून काजलकौर व छोटा भाऊ हे दोघे तातडीने घराकडे पळाले. त्यांनी तातडीने घराच्या मंडळीना ही बाब सांगितली. त्यामुळे कुंटुबीयांसह  ग्रामस्थ तातडीने धावले. ग्रामस्थांनी दोघींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एकीचा मृत्यू झाला होता. तर दुसरीला परभणी जिल्हा रुग्णालयात आणण्यात येत असताना तिचा मृत्यू झाला.  दरम्यान, या प्रकरणात दोघींच्या कुटुंबीयांनी घातपाताची शंका व्यक्त केली असल्याचे समजते. 

बातम्या आणखी आहेत...