आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साळुंकी - कावळ्याच्या भांडणात वीज तार तुटली, स्पार्किंगमुळे आग, 2झोपड्या खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - विजेच्या तारेवर बसलेल्या साळुंक्या व कावळ्याच्या भांडणात पाच शेतमजुरांच्या संसाराची राखरांगोळी झाली. पक्ष्यांच्या या भांडणात एक साळुंकी वीज तारेला चिकटल्याचे स्पार्किंग होऊन ठिणग्या उकीरड्यावर पडल्या. त्यामुळे वाळलेल्या गवताने पेट घेतला. गवताला लागलेली आग शेतमजुरांच्या झोपड्यांपर्यंत पोहोचली आणि  आगडोंब उसळला. यात दोन झोपड्या जळाल्या.

 

तर तीन घरकुले अर्धवट जळाली.  ग्रामस्थांनी सबस्टेशनला फोन करताच  गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. मात्र तोपर्यंत आगीने पाच शेतमजुरांच्या संसाराची राखरांगोळी केली होती.   ग्रामस्थांनी कुलूप तोडून  घरकुलांचे दरवाजे व खिडक्यांना लागलेली आग आटोक्यात आणली.  गव्हाच्या काडातून  गावाच्या दिशेने  जाणारी आग पसरू नये म्हणून सरपंच व ग्रामस्थांनी  आगीवर काळी  माती टाकून ती विझवल्याने मोठा अनर्थ टळला.

 


अंबाजोगाई तालुक्यातील हातोला गावात गुरुवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली .  २०० गावकरी वॉटर कप स्पर्धेत   श्रमदानासाठी गावाजवळील आंबेविहर येथे गेले असताना ही घटना घडली. 

बातम्या आणखी आहेत...