आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबाजोगाई : प्रवाशाने गाडीबाहेर काढलेला हात दंडापासून निखळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - वाहनाच्या खिडकीतून हात बाहेर काढणे प्रवाशाला चांगलेच महागात पडले.  विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे या प्रवाशाचा हात कोपरापासून निखळून पडला. ही भीषण घटना अंबाजोगाई जवळील लोखंडी सावरगाव येथील लातूर टी-पाॅईंटवर गुरुवारी  रात्री ८ वाजता घडली.


उस्मानाबाद येथील अर्जुन सोमनाथ डुरलेकर (५०) हे नातेवाइकाच्या मुलीसाठी स्थळ बघण्यासाठी अंबाजोगाईला आले होते. दिवसभराचा कार्यक्रम आटोपून रात्री उस्मानाबादला परत जाण्यासाठी ते टाटा सुमो (एमएच ०८ सी ७५८३) गाडीतून निघाले. गाडी लोखंडी सावरगाव जवळील लातूर टी-पाॅईंटवर आली असता काहीतरी वस्तू बाहेर टाकण्यासाठी त्यांनी निष्काळजीपणे उजवा हात गाडीच्या खिडकीबाहेर काढला. तेवढ्यात समोरून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाचा फटका बसल्याने अर्जुन डुरलेकर यांचा हात दंडापासून तुटून रस्त्यावर पडला. खाली पडलेल्या हातावरून अनेक वाहने गेल्याने हात चेंदामेंदा झाला. गंभीर अवस्थेतील जखमी डुरलेकर यांना नागरिकांनी तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सध्या डुरलेकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे.

बातम्या आणखी आहेत...