आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऊसतोड कामगाराचे भरदुपारी फिल्मीस्टाइल अपहरण; 24 तासांत आरोपी गजाअाड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चितेपिंपळगाव- चितेपिंपळगाव  येथील ऊसतोड कामगार रमेश विलास मगरे (५०) व त्यांचा मित्र शहादेव काशीनाथ गाडेकर (४७, रा. चितेगाव, ता. औरंगाबाद) हे १८ एप्रिल रोजी काही कामानिमित्त औरंगाबादला दुपारी दोन वाजता दुचाकीवर बसून जात होते. त्या वेळी औरंगाबाद-बीड हायवेवरील निपाणी फाट्याजवळ एक बोलेरो (एमएच ४५ एन ७१०) आडवी लावून मोटारसायकलस्वारांना दमदाटी करून त्यातील रमेश मगरेला बळजबरीने बोलेरोत कोंबले व शहादेव गाडेकरांना धक्काबुक्की केली. त्यानंतर बोलेरो सुसाट औरंगाबादमार्गे पसार झाली.  शहादेव गाडेकर यांनी सरळ चिकलठाणा पोलिस स्टेशन गाठून झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली व रीतसर तक्रार दिली. सदर माहिती मिळताच औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक आरती सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांचे पथक मोबाइल ट्रेस करून आरोपी  पवन अशोक कचरेने उपळाई (ता. माडा, जि. सोलापूर) येथे डांबून ठेवलेल्या चितेपिंपळगाव  येथील ऊसतोड कामगार रमेश मगरे याची सुटका केली. या घटनेचा चिकलठाणा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास  सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलिस उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण करत आहेत. सहायक फौजदार नारायण कटकुरी, बीट जमादार लहू थोटे, दीपक सुरोशे आदींनी एका आरोपीस सोलापूर येथून अटक केली. अद्याप तिघे फरार आहेत.  पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

 

दोन लाख नव्वद हजार रुपये घेतली होती उचल
सोलापूर येथील लोकनेते बाबूराव पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी डोकी सेंटर ऊसतोड टोळीसाठी दोन लाख नव्वद हजार रुपये उचल घेतले होते आणि आता कारखान्याचा पट्टा पडणार होता. पण हे कामालाच गेले नाही. मग पैसे मागण्यासाठी आले असता दिलेले पैसे परत येत नसल्याने एके दिवशी चार जण नियोजन करून रमेश मगरे याला उचलून घेऊन आले तरच आपले पैसे मिळतील म्हणून रमेश मगरेचे भरदिवसा अपहरण करण्यात आले. या वेळी अारोपीच्या तावडीतून पोलिसांनी रमेश मगरेची सुटका केली. 

 

बातम्या आणखी आहेत...