आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग दिव्या आधार न घेता पायी चालणार! नारायण सेवा संस्थेचा पुढाकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- जन्मताच दोन्ही डोळ्यांनी व्यंग, पायाने अपंग आणि जन्मदात्या आई वडिलांनी रेल्वेस्टेशनवर सोडून दिलेल्या  दिव्या समजीसकर ही बालिका आता आधार न घेता काही दिवसांतच चालताना दिसेल.  उदयपूर येथील  नारायण सेवा संस्थेचे तज्ञ डॉक्टर १२ मार्च रोजी औरंगाबादेत तिची तपासणी करणार असून  उदयपूर येथे तिच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.


आईने दुसरे लग्न केले तर दारूड्या वडिलांनी पुण्याच्या खडकी   रेल्वे स्टेशनवर या तीन भावंडांना सोडून दिले. आईवडिलांच्या मायेला पारखे झालेल्या   जान्हवी  (६) , दिव्या (१२) भाऊ प्रदीप या तीनही भावंडांवर रेल्वे स्टेशनवर  तीन महिने भीक  मागण्याची वेळ आली होती. मात्र तांदळा  येथील साहेबराव पाटील विद्यालयाचे शिक्षक धर्मराज जरांगे व मीना जरांगे यांनी या तीनही भावंडांना आश्रय दिला. या भावंडातील दिव्याच्या दोन्ही  डोळ्यांनी  व्यंग असून  अपंग आहे. पायाने तिला एकटे चालता येत नाही. कोणाचा तरी आधारच घ्यावा लागतो.  या तीनही भावंडांच्या व्यथेचे वृत्त दिव्य मराठीने १० फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित केले असता त्याची दखल औरंगाबाद येथील देवगिरी कॉलेजचे प्रा.माधव हंडे  यांच्यासह राहुल पटेल, शेख महेमुद, आनंद पाटील यांनी घेतली.  रमणिकलाल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्ताने  दिव्याला बीडहून उदयपूरला  ऑपरेशनसाठीचा जाण्या येण्याचा आर्थिक  खर्चही   पटेल उचलणार आहेत . 

 

१२ मार्च रोजी औरंगाबादेत शिबिर
१२ मार्च  रोजी नारायण सेवा संस्थान उदयपूरच्या वतीने औरंगाबाद शहरातील अभिषेक अपार्टमेंट, वेदांतनगर,  रेल्वे स्टेशन रोड येथे सकाळी नऊ वाजता मोफत खास अपंगाची  तपासणी व उपचार, ऑपरेशनसाठी तपासणी व साहित्य वाटप केले जाणार आहे. यासाठी डॉ.बी.आर. शिंदे तर शिबिर टीम मधील  प्रभारी हरिप्रसाद लढा, सुरेंद्र सिंह झाला ,लोगर डागी ,प्रचारक निखिलेश राव,  आदी उपस्थित राहणार आहेत.

 

 

समाजभान जपणाऱ्यांनी समोर यावे 
रमणिकलाल पटेल यांच्या माध्यमातून आम्हाला सत्पुरुष भेटला असून  दिव्याच्या दोन्ही पायांचे  ऑपरेशन होणार असल्याने ती आता चांगली चालू शकेल.  अशा प्रकारे  समाज भान जपणाऱ्या लोकांनी समोर येण्याची गरज आहे जेणे करून वंचित निराधार अपंग , अनाथांना खऱ्या अर्थाने आधार मिळेल.
- धर्मराज जरांगे, शिक्षक, तांदळा

बातम्या आणखी आहेत...