आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला 15 वर्षंाची शिक्षा; परभणीच्या जिल्हा न्यायालयाचा निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर  अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विजय सुतारे याला १५ वर्षे कारावासाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एम.सादराणी यांनी ठोठावली.    कोतवाली ठाण्यात २० फेब्रुवारी २०१४ रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. त्यात पाथरी रस्त्यावरील शाहू नगरातील विजय विलासराव सुतारे हा आपल्या मुलीस त्रास देत होता. त्याने सहारानगर येथील नातेवाइकांच्या घरातून मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. मुलगी अल्पवयीन असताना तिला आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे नमूद केले होते.  


पोलिसांनी विजय सुतारे यास अटक केली होती. कोतवाली पोलिस ठाण्याचे तपासी अंमलदार विठ्ठल मोतीराम कांगणे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद गाजरे यांनी युक्तिवाद केला. परिस्थितीजन्य पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एम.सादराणी यांनी विजय सुतारे याला १५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.

बातम्या आणखी आहेत...