आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातूनही संधी; ‘एमपीएससी’ची नवी घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत मागासवर्गीय उमेदवारांनी राखीव जागांमधून परीक्षेचा फॉर्म भरून फी भरल्यास  गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवड खुल्या प्रवर्गातूनही करण्याची घोषणा एमपीएससीने संकेतस्थळावर केली आहे. 


संकेतस्थळावरील माहितीनुसार १ एप्रिल २०१४ च्या लोकसेवा आयोगाच्या निर्णयानुसार मागासवर्गीय उमेदवारांनी सवलतीची फी  भरल्यास त्यांचा फक्त राखीव जागांसाठीच विचार केला जात होता. त्यामुळे आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज भरताना मागासवर्गीय उमेदवारांनी सवलतीच्या फीचा पर्याय निवडल्यास त्यांना ते खुल्या प्रवर्गासाठीही अर्ज करू इच्छितात का? असा प्रश्न विचारला जात असे व पूर्ण फी न भरल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचार होणार नाही, अशी सूचना दिली जात असे. एमपीएससीने २० डिसेंबर २०१७ रोजी वरील निर्णयात सुधारणा करून, मागासवर्गीय उमेदवारांनी सवलतीची फी भरल्यास राखीव प्रवर्गाबरोबरच खुल्या प्रवर्गाच्या पदासाठीही विचार केला जाणार आहे. या सुधारित निर्णयामुळे ऑनलाइन अर्ज प्रणाली प्रक्रियेमध्ये फिसबाबत पूर्वी येणारी सूचना आता येत नाही.  


दुय्यम सेवा पूर्व परीक्षेतील संभ्रम दूर 
सध्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक व सहायक कक्ष अधिकारी या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याअनुषंगाने काही मागासवर्गीय उमेदवारांकडून याबाबत विचारणा होत आहे. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षांसाठी मागासवर्गीय उमेदवारांनी सवलतीची फी भरणे पुरेसे आहे. खुल्या प्रवर्गातील पदांसाठी विचार होण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांनी संपूर्ण फी भरण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सवलतीची फी भरली तरी त्यांचा राखीव पदांबरोबरच खुल्या प्रवर्गातील पदांसाठीही त्यांचा विचार होईल. 

बातम्या आणखी आहेत...