आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • विद्यार्थ्याला 1 कोटींचे बक्षीस देऊन चर्चेत आला होता हा कोचिंग संचालक, जुन्या पार्टनरनेच केला Murder Former Partner Chandan Kumar Accused In Murder Charges Of Avinash Chavan Latur Latest News And Updates

1 कोटींचे बक्षीस अन् Sunnyला आणून चर्चेत होता हा कोचिंग संचालक, पार्टनरनेच केला Murder

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- 'स्टेप बाय स्टेप' कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांची त्यांचाच जुना पार्टनर व सध्या कुमार मॅथ्स क्लासेसचा संचालक प्रा. चंदनकुमार यानेच सुपारी देऊन घडवून आणल्याचे समोर आले आहे. चंदनकुमारसह प्रत्यक्ष खून करणाऱ्या 5 आरोपींना पोलिसांनी आज (मंगळवार) अटक केली. चंदनकुमार हा मूळ बिहारचा असल्याचे सांगण्यात येते.

 

जिमच्या उद्घाटनाला सनी लियोनीला बोलावले
कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या अविनाश चव्हाण हे कोचिंग क्लासेसशिवाय जिमसुद्धा चालवत होते. गतवर्षीच आपल्या जिमच्या उद्घाटनासाठी त्यांनी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सनी लियोनीलाही बोलावले होते.

 

विद्यार्थ्याला दिले 1 कोटींचे बक्षीस
अविनाश चव्हाण यांनी आपल्या कोचिंग क्लासमधील एका विद्यार्थ्याला चांगले गुण मिळाल्याने 1 कोटी रुपयांचे बक्षीसही दिले हेाते. रविवार, 24 जून रोजी संध्याकाळी अविनाश चव्हाण कारने घरी परतत असताना शिवाजी स्कूलजवळ अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यातच त्यांचा अंत झाला होता.

 

कोण आहे आरोपी चंदन कुमार?
चंदन कुमार हा मूळ बिहारचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने लातूरच्या प्रतिष्ठित महाविद्यालयात काही काळ प्राध्यापक म्हणूनही काम केले असल्याचे सांगण्यात येते.
सध्या कुमार मॅथ्स क्लासेस नावाने तो कोचिंग चालवतो. तेथे 11वी, 12वी, MH-CET तसेच JEE (Main+Advance) ची शिकवली दिली जाते.
व्यावसायिक स्पर्धेतून हत्या केल्याचा पोलिसांना आधीच संशय होता. त्या परीने सर्व तपास सुरू होता. चंदनकुमार आणि अविनाश चव्हाण जुने पार्टनर होते. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर दोघे विभक्त झाले होते. अविनाश चव्हाण आपली हत्या करणार असल्याची माहिती चंदनकुमारला मिळाली होती. त्यामुळे चंदनकुमारनेच चव्हाण यांची 20 लाख रुपयांत सुपारी देऊन हत्या घडवली, असे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे.


अल्पावधीत थक्क करणारी आर्थिक प्रगती
अविनाश चव्हाण यांचा जन्म एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात झाला. लहानपणापासून मनसेत काम करणाऱ्या अविनाश चव्हाण यांनी अल्पावधीत खूप मोठी प्रगती केली होती. कोचिंग क्लासेसमधील संधी शोधत त्यांनी हैदराबाद, कोटा येथून तज्ज्ञ प्राध्यापकांना लातूरला आणले आणि व्यवस्थापन आपल्या हातात ठेवून कोचिंग क्लास सुरू केला. 

> चव्हाण यांनी काही वर्षांपूर्वी दिशा फिजिक्स कोचिंग क्लास सुरू केला. यासाठी हैदराबाद येथून एक प्राध्यापक आणून त्यांची वेतनावर नेमणूक केली. दोन वर्षांपूर्वी दिशा फिजिक्स कोचिंग क्लासचे रूपांतर स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेसमध्ये करण्यात आले. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयाचे हे क्लासेस आहेत.

> त्यातून चांगले पैसे मिळू लागल्यानंतर त्यांनी वर्षभरापूर्वी अडॉल्फ जिम सुरू केली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी हे जिम दुसऱ्याला चालवायला देऊन पूर्ण लक्ष कोचिंग क्लासेसवर केंद्रित केले. त्यांनी क्लासेसचा विस्तार करत या वर्षी नांदेडला ब्रँच सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोमवारीच त्याचा प्रारंभ होणार होता.

> लातूर-नांदेडमधील इतर क्लासेस एका विषयासाठी 30 हजार रुपयांपर्यंतचे फीस आकारत असताना चव्हाण यांनी 7 ते 8 हजार फीस ठेवली होती. त्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांचा ओढा तिकडे वाढला होता. त्यांच्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांचे हितशत्रूही निर्माण झाले. त्यांनी मोठ्या आर्थिक उलाढालीही केल्याची माहिती पुढे आली आहे. नांदेड येथे त्यांनी मोक्याच्या जागेवर कोट्यवधी रुपयांची जागा घेतल्याची चर्चा आहे. अल्पावधीत आणि अत्यंत कमी वयात त्यांनी केलेली आर्थिक प्रगती थक्क करून टाकणारी होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाशी संबंधित आणखी काही Photos...    

 

बातम्या आणखी आहेत...