आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घनकचरा प्रकल्प बंद, जालन्यातही कचराकोंडी;नऊ वर्षांपासून एकाच जागी कचऱ्याचे संकलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- जालनेकरांसाठी ओल्या व सुक्या कचऱ्याच्या संकलनासाठी कुठलीही सुविधा नाही. त्यातच शहरातून निघणारा दररोजचा ८० टन कचरा डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. या कचऱ्याला आग लावून दिली जात आहे. यामुळे पूर्वेकडून डंपिंग ग्राउंडच्या कचऱ्याचा तर पश्चिमेकडून औद्योगिक वसाहतीतून होणाऱ्या वायू प्रदूषणाचा जालनेकरांना सामना करावा लागत आहे. त्यातच नऊ वर्षांपासून घनकचरा प्रकल्प बारा वेळा सुरू व बंद झाल्याने कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने औरंगाबादच्या नारेगावप्रमाणे  जालन्याचीही ‘कचराबाद’कडे वाटचाल होत आहे. 


जालना शहरात कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात बिकट झाली आहे. जागोजागी साचणारा कचरा, कचराकुंड्या पेटवून देणे हे प्रकार गंभीर झाले आहेत. तसेच शहरातील दररोजचा निघणारा कचरा डंपिंग ग्राउंडवर नेऊन टाकला जातो. परंतु, त्या ठिकाणीही आता कचरा टाकण्यासाठी जागा न राहिल्यामुळे पालिका प्रशासनाकडून नवीन जागेचा शोध घेतला जात आहे. शहरातून निघणाऱ्या कचऱ्यावर कुठलीच प्रक्रिया होत नसल्याने दिवसेंदिवस कचऱ्याचे साम्राज्य वाढत चालले आहे. या कचऱ्यामुळे डंपिंग ग्राउंडच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्यासोबतच कचऱ्यात येत असलेल्या प्लास्टिक पिशव्या, दवाखान्यातील ओला, सुका कचरा यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. ही दुर्गंधी जालना शहरातील इंदिरानगरपर्यंत येत असल्याने या परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता  आहे. 

 

नुसताच इशारा 
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी २०१५ मध्ये १५  दिवसांत प्रकल्प सुरू न झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. मुख्याधिकाऱ्यांनीही  जानेवारीत  एजन्सीवर गुन्हे दाखल करण्याची नोटीस दिली होती. मात्र कारवाई झाली नाही. 

बातम्या आणखी आहेत...