आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीत जीपमध्ये डांबून बैलांची कत्तलखान्याकडे वाहतूक; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


परळी वैजनाथ (बीड)-  सोलापूर जिल्ह्य़ातून परळीला कत्तलखान्याकडे लहान बैलांना   एका जीपमध्ये अतिशय क्रुरपणाने डांबून वाहतूक करणाऱ्या गाडीला शहरातील हनुमान चौकात पकडण्यात आले. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 


महिंद्रा बलेरो पीकअप जीप (क्र. एमएच 13 /सीयु 0885) मध्ये आठ लहाने बैल अतिशय क्रुरपणाने डांबून दाटीवाटीने त्यांची वाहतूक होत आहे, ही माहिती मिळाल्यानंतर शहरातील हनुमान चौकात हे वाहन पकडण्यात आले. सोलापूरपासून याच अवस्थेत या मुक्या प्राण्यांना डांबून त्यांची वाहतूक ही परळीतील कत्तलखान्याकडे देण्यासाठी केली जात असल्याचे दिसून आले. या प्रकरणी कत्तलीसाठी मुक्या प्राण्यांना त्रासदायक वाहतूक करणे, क्रुरपणाने वागवणे आदींसाठी दोषी आढळल्यावरून आरोपी इरशाद दस्तगीर शेख (वय 31, वर्षे रा. पापनास ता. माढा, जिल्हा सोलापूर) अकबर युसूफ कुरेशी (रा. पापनास, ता. माढा, जिल्हा सोलापूर), गौसभाई (रा. परळी) या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सपोनि दत्तात्रय काळे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 30/2018 प्राण्यांना क्रुरपणाने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (1)(घ)(च), महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम 1976 चे सुधारणा कलम 5 ए, 5 बी, 9 तसेच मोटार वाहन कायदा कलम 23(1), /177, 3 (1)/181, 158/177 व महाराष्ट्र पोलिस अधिनियमचे कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दत्तात्रय काळे, पो. ह. बी. के. लांडगे हे करीत आहेत. 
      

बातम्या आणखी आहेत...