आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आॅडिओ क्लिपप्रकरणी मुंडेंची पोलिसांत धाव, राजकीय षड्‌यंत्र असल्याची तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी (बीड)- विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित आॅडिओ क्लिप प्रकरणी रविवारी रात्री धनंजय मुंडे यांनी परळी शहर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. दरम्यान, पंकजा मुंडेंच्या पीएच्याही कथित आॅडिओ क्लिप प्रकरणात यापूर्वीच गुन्हा नोंद झाला आहे.


मागील तीन दिवसांपासून सोशल मीडियावर  एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांबद्दल काही  अपशब्द बोलल्याचा उल्लेख आहे. या क्लिपमध्ये आपल्या आवाजाची नक्कल करण्यात आली असून त्यामागे आपली समाजातील प्रतिमा मलीन करण्याचा उद्देश आहे. 

 

क्लिपमधील आवाज आपला नसून  अज्ञात व्यक्तीने आपल्या राजकीय विरोधकांशी संगनमत करून मला बदनाम करण्यासाठी  षड्यंत्र रचल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. आपण कोणाहीबद्दल अपशब्द वापरले नसल्याने सदर बनावट ध्वनिफीत प्रकरणाची सखोल चौकशी करावी,  सदरील ध्वनिफीत फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवून त्यातील आवाज कोणाचा आहे हे शोधून गुन्हा दाखल करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी  तक्रारीत  केली आहे.

बातम्या आणखी आहेत...