आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतिमंद मुलीचा विनयभंग प्रकरण: आरोपीला सश्रम कारावास, आर्थिक दंडाची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- मतिमंद मुलीचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्र.१ यांनी २ वर्षे ३ महिने सश्रम कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना ९ एप्रिल २०१६ रोजी कळंब तालुक्यातील घारगाव येथे घडली होती. 


घारगाव येथील भोळसर व गतिमंद मुलगी ९ एप्रिल २०१६ रोजी गाव शिवारात  गाय चारण्यासाठी गेली असता आरोपी खंडू रामदास भुतापल्ले (रा.घारगाव) याने तिच्यावर अत्याचार करून तिला मारहाण केल्याची तक्रार तिच्या आईने शिराढोण पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार भुतापल्ले याच्याविरोधात गुन्हा नोंद होऊन पोलिस उपनिरीक्षक एम.एच. सय्यद यांनी तपासाअंती जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. अे. अे. आर. औटी यांच्यासमोर  झाली.  सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त साहाय्यक अभियोक्ता जयंत देशमुख यांनी एकूण ८ साक्षीदार तपासले.  अॅड. देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी खंडू याला शिक्षा सुनावली. 

बातम्या आणखी आहेत...