आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांच्या संपामुळे व्यवहार ठप्प, परभणीत 800 अधिकारी-कर्मचारी संपात सहभागी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपात जिल्ह्यातील 19 राष्ट्रीय बँकांतील 800 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. संपामुळे जिल्ह्यात दोन हजार कोटीं रुपयांच्या व्यवहारावर परिणाम होणार आहे. दरम्यान, येथील स्टेट बँक इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालया समोर बुधवारी सकाळी निदर्शने करण्यात आली. 


परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकाच्या 19 शाखातील कामकाज बुधवारपासून ठप्प झाले आहे. युनाटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' या शिखर संघटनेने सकाळी 10 वाजता येथील जुनी स्टेट बॅंक हैद्राबादची मुख्य शाखा असलेली आणि आताच्या इंडिया बॅंकेत निदर्शने केली. या संपामुळे पिक कर्ज वाटप आणि एटीएमवर परिणाम झाला आहे.


प्रलंबित तसेच अत्यल्प वेतनवाढीच्या प्रस्तावाविरोधात देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी आजपासून दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस बँकांच्या शाखांमधील व्यवहार ठप्प होणार आहेत. परिणामी खातेदारांना ऑनलाइन व्यवहार व एटीएमवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...