आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड जिल्ह्यात 186 ग्रामपंचायतींमध्ये 298 रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- निवडणूक आयोगाने मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासह सर्व सदस्य पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोट निवडणुकीच्या कार्यक्रमात अंशतः बदल केला आहे. 
  

ज्या ग्रामपंचायतीची मुदत ७ मार्च ते  ३१ मे या कालावधीत संपत आहे व रिक्त पदांच्या सर्व पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक १० फेब्रुवारी ऐवजी १२ फेब्रुवारी असा राहील. या दिवशी सकाळी १०.३० ते सायं ६.३० यावेळेत संगणकीकृत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. नामनिर्देशपत्रासह निवडणुकीची सर्व प्रक्रिया संगणकीकृत पद्धतीने राबवण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात १८६ ग्रामपंचायतीमध्ये २९८ रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.   


नामनिर्देशनपत्रांची छाननी १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक  १६ फेब्रुवारी रोजी दु. ३ वाजेपर्यंत आहे. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ १६ फेब्रुवारी रोजी दु. ३ वाजेनंतर आहे.  मतदान २७ फेब्रुवारी (मंगळवार) रोजी मतदान होईल.  मतमोजणी २८ फेब्रुवारी रोजी होईल. 

बातम्या आणखी आहेत...