आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी येथील शनिवार बाजार परिसरात बिल्डिंगला आग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- शनिवार बाजार भागातील एका बिल्डिंगला आग लागल्याची घटना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या मदतीने जवळपास अडीज तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.

 


शनिवार बाजार परिसरातील नानलपेठ कॉर्नर परिसरात एका बिल्डिंगमध्ये दुपारी अचानक आग लागली. ही आग वाढतच गेली.  इमारतीच्या दुसर्‍या मजल्यापर्यंत ही धुराचे लोट पसरत होते. आग लागल्याची माहिती अग्नीशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल झाले होते. बिल्डिंगच्या बाहेरील भागात असलेल्या एका दुकानामध्येही धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे परिसर काळाकुट्ट दिसत होता. अशातही अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी बिल्डिंगच्या दुसर्‍या मजल्यावर धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. दुपारी अडीच वाजेपर्यंत कर्मचारी व पोलिस प्रशासनाच्या वतीने आग विझविण्यात आले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

 

 

बातम्या आणखी आहेत...