आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावईबापूंना हवाई सफर, पाटोद्यात उतरले हेलिकॉप्टर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा- एरव्ही केवळ राजकीय नेत्यांचेच हेलिकॉप्टर पाहण्याची सवय असलेल्या पाटोदेकरांसाठी रविवारचा दिवस मात्र कुतूहलाचा ठरला. चक्क नवरदेव नवरीला घेऊन शहरात दाखल झाला आणि वधू वरांची ही हवाई सफर पाहण्यासाठी पाटोदेकरांनी गर्दी केली.
 

पाटोदा तालुक्यातील रहिवासी असलेल्या लल्लू शहा यांचे पुतणे व अझर सय्यद यांचे चिरंजीव मोहंमद आयाज यांचा रविवारी कर्जत येथील नगरसेवक तारीख मोहंमद सय्यद यांची कन्या मिजबा हिच्याशी निकाह झाला. जावयाचा अनोखा थाटबाट करण्यासाठी सासरे तारीख मोहम्मद यांनी मुलीची पाठवणी थेट हेलिकॉप्टरने करण्याची इच्छा दर्शवली होती.

बातम्या आणखी आहेत...