आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानी मंदिरात बेकायदा चित्रीकरण; 3 ताब्यात,२ फरार, चौकशीनंतर होणार कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर -  तुळजाभवानी मंदिर परिसरात विना परवाना बेकायदेशीररीत्या ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने शूटिंग करताना बुधवारी (दि. ३०) सायंकाळी सात वाजता तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघे फरार झाले असून ड्रोन कॅमेरा, तीन मोबाइल ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत गेलेल्या पथकाकडून शूटिंग केले जात होते, असे सांगण्यात आले. तशी ठाण्यात नोंदही घेण्यात आली आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई होणार आहे. 


मंदिर परिसरात पाच युवक ड्रोन कॅमेरा व एक कॅमेऱ्याच्या साहाय्याने राजे शहाजी महाद्वार परिसरात संशयास्पदरीत्या शूटिंग करीत होते. शूटिंगमुळे परिसरातील भाविक व नागरिकांनी मोठी गर्दी केली. यावेळी मंदिर परिसरात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी पाच पैकी तिघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. यामध्ये सचिन हरिभाऊ मोरे (उस्मानाबाद), गोपाळ गबाजी कावळे (मुंबई), तौहिर नासिर शेख (मुंब्रा, ठाणे) यांचा समावेश आहे. अन्य दोघे फरार झाले आहेत. त्यांच्याकडे शूटिंगचा कसलाही परवाना नसल्यामुळे पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यांच्याकडून कॅमेरे, तीन मोबाइल जप्त करण्यात आले.

 

  दरम्यान जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी हे शासकीय पथक असून परवानगी असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी कारवाई  स्थगित करून डायरीत नोंद घेतली आहे. मात्र, लेखी परवानगी न आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पो.नि. राजेंद्र बोकडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...