आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण; भारतीय जैन संघटनेने घेतला पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- भारतीय जैन संघटनेतर्फे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अशा मुलांनी यासाठी संपर्क साधावा असे आवाहन अ‍ॅड. झेड.आर.मुथा यांनी केले आहे.

 

वाघोली (पुणे) येथील भारतीय जैन संघटनेच्या पुर्नवसन प्रकल्पामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना 12 वी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एक जानेवारी 2016 नंतर ज्या मुलां-मुलींच्या आई किंवा वडील यापैकी एका जरी आत्महत्या केली असेल अशा चौथी उत्तीर्ण झालेल्या मुलां-मुलींना मोफत शिक्षणासह निवास, भोजन, शैक्षणीक साहित्य आदींची सोय करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेमार्फतही सातारामध्ये पाचवी, सहावी व सातवीच्या मुला-मुलींना पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. संबंधीतांनी सात जून पर्यंत अ‍ॅड.दर्शन कळमकर, अ‍ॅड.झेड.आर.मुथा, धरमचंद गंगवाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भारतीय जैन संघटनेेने केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...