आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालकाच्या छातीवर तासभर नाचत होता रेडा, मृतदेहाचा चेंदामेंदा करूनच झाला शांत!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- तासभर मालकाच्या मृतदेहावर नाचून नाचून चेंदामेंडा करूनच रेडा शांत झाल्याची घटना सेनगाव तालुक्यातील चोंढी बु. येथे काल (शनिवार) दुपारी 2 च्या सुमारास घडली. मागील सहा वर्षांपासून प्रेमाने लावू पिवू घालणाऱ्या आपल्याच मालकाच्या जीवावर हा रेडा का उठला,  याचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही. ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी दुसरा व्यक्ती नव्हता.

 

प्रल्हाद रामजी नानवटे (50 ) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. दुधाचा व्यवसाय असलेले नानवटे यांनी गायी, म्हशी व एक रेडा पाळला होता. यंदा दुधाचा व्यवसाय कमी करून त्यांनी फक्त रेडाच ठेवला होता. बाकी जनावरे विकून टाकली होती. ते रेड्याची चांगली काळजी घेत. आज दुपारी नानावटे यांनी गावात असलेल्या नगर भोजनाचे जेवन करुन गावापासून सुमारे अर्धा किमी अंतरावर असलेल्या शेतात बांधलेल्या रेड्याला चारा पाणी करण्यासाठी गेले. पाणी पाजण्यासाठी गोठ्यातून रेड्याला सोडून पाण्याकडे नेत असताना रेड्याने त्यांना मागून जोराची धडक दिली. धडक ऐवधी मोठी होती की रेड्याची शिंगे नानवटे यांच्या पाठीतून घुसून सरळ पोटातून निघाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नानवटे यांच्या मृतदेहावर रेडा तासभर नाचत राहिला. अगोदर नानवटे यांचा मदतीसाठी आवाज आणि नंतर रेड्याचा सूड घेण्यासाठी चालू असलेला डरकळीचा आवाज यामुळे शेजारी शेतातील शेतकरी व गावकरी घटनास्थळी दाखल झाले. परंतु काही केल्या मृतदेहापासून हटायला तयार नव्हता. त्यानंतर जमावाने रेड्याला काठ्यांनी फटके देवून मृतदेहापासून बाजूला सारले.  दुपारी साडे तीनच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

 

गोरेगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ढील तपास पोलिस करीत आहेत.

 

रेड्यावर मालकाचे जीवापाड प्रेम

रेड्यावर मालकाचे जीवापाड प्रेम होते. तसेच यापूर्वी कधीच या रेड्याने मालकावर किंवा घरातील सदस्यांवर हल्ला केला नव्हता. परंतु आज असे का घडले असा सर्वानाच प्रश्न पडला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...