आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WARI: बिंदुसरा नदीच्या तिरीवर रंगला आजोबा गोविंदपंत व नात मुक्ताईबाईचा भेट सोहळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- आषाढी वारीसाठी महाराष्ट्राभरातून पंढरपूरला जाणार्‍या शेकडो दिंड्यांमधून शासनमान्य मानाच्या सात प्रमुख पालखी सोहळ्यातील संत मुक्ताबाई महाराज यांची पालखी दोन दिवसांचा विसावा घेत होती. बुधवारी सकाळी पालखीने पालीकडे प्रस्थान केले. सकाळी पेठ बीड येथील बालाजी मंदिर येथे नवरंग मित्र मंडळाकडून महाआरती करण्यात आली. बिंदुसरा नदीच्या तिरावर संत मुक्ताबाईचे आजोबा गोविंदपंत यांची समाधी आहे. सकाळी 8 वाजता गोविंदपंत समाधीस्थळी मुक्ताबाई पालखीचा भेटीचा अनुपम्यसुख सोहळा भाविकांनी  नयनी साठवला. गोविंदपंत हे बीड येथे जाधवराजाच्या सेवेत सेनापती होते. म्हणूनच बीड शहराचे आदिशक्ती मुक्ताई यांच्यात आजोबा- नातीचे  विशेष नाते आहे.

 

मुक्ताबाई संस्थानकडून आजोबांना शाल-श्रीफळ अर्पण केले. मुक्ताबाईच्या पादूकांना गोविंदपंत समाधीसमोर ठेवून  पूजन कण्‍रयात आले. वारकरी भाविकांनी गोविंदपंत-मुक्ताबाई नामाचा गजर केला. यावेळी महामंडलेश्वर अमृतदास महाराज जोशी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, विश्वस्त पंजाबराव दादा पाटील  व मुक्ताबाई फडावरील दिंडीप्रमुख, वारकरी उपस्थित होते. मुख्य बाजारपेठेतून बार्शी नाक्याकडे जातांना भगवान बाबा प्रतिष्ठान यांनी सोहळ्याचे जोरदार स्वागत केले. बीड शहरवासीयांना भक्तिभय वातावरणात मुक्ताबाईचा निरोप घेतला.

 

अहिरवडगाव दुपारी अर्धा तास विसावा येथे घेतला. जवळच असलेल्या  पाली गावी मुक्कामात सोहळा विसावला. सोहळा लवकरच पोहोचल्याने भाविक कपीलधार येथे दर्शनासाठी गेले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा..बिंदुसरा नदीच्या तिरीवर रंगलेला आजोबा गोविंदपंत व नात मुक्ताईबाईचा भेट सोहळा

बातम्या आणखी आहेत...