आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उस्मानाबाद : साइडपट्ट्यावरील खड्ड्यामुळे बसच्या 3 कोलांट्या; 34 प्रवासी जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद ढोकी - समोरून जाणाऱ्या ट्रकला ओलांडण्याच्या प्रयत्नात चाक साइडपट्टीवरील खड्ड्यात गेल्यामुळे तब्बल ७२ प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसने तीन कोलांट्या खाल्ल्या. या वेळी अचानक बसचा टप निघून पडल्यामुळे अनेक प्रवासी बालंबाल बचावले. मात्र, या अपघातात  ३४ प्रवासी जखमी झाले. ढोकीजवळच असलेल्या गोरेवाडी पाटी (ता. उस्मानाबाद) येथे शनिवारी (दि. २८) सकाळी ८.१५ वाजता हा थरार घडला.   या अपघातामुळे निकृष्ट साइडपट्ट्यांचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.   


लातूर आगारातून ७.३० वाजता सुटणारी बस (एमएच २० बीएल  १७८८) उस्मानाबादकडे येत होती. गोरेवाडी पाटीनजीक बस आल्यानंतर समोर एक ट्रक  ढोकीच्या दिशेने जाताना दिसला. ट्रकला आेलांडण्यासाठी चालकाने बसचा वेग वाढवला. या वेळी बसचा अपघात झाला.
अपघातातील काही जखमी   : संध्या देशपांडे (समर्थनगर), अरुण मुसळे (कसबा राममंदिर), नीता घोगरे (सांजा रोड), कुंडलिक पवार (छत्रपती हायस्कूल, उस्मानाबाद), रफिक शेख (तावरजखेडा), नीता कोरे, उत्तम हंबिरे, राजनंदिनी तोडकरी, ऊर्मिला तोडकरी, महानंदा गायकवाड, रोहित घोगरे, निशा गायकवाड,  कल्पना कांबळे, बालाजी तांदळे, सुरेखा लोमटे, द्रौपदा गवळी, उषा घाडगे, रफिक शेख, व्यंकट चव्हाण, प्रतिभा यशवंते, दगडुबाई राम धावारे, सुरेखा  आवटे, संजय कदम, जयश्री माळी, सविता पाटील, सुनीता शेरखाने,भगवान पारेहल, सुनीता राजहंस, वैशाली राजहंस, रितेश नितनवरे, चालक विकास सुभाष कठाळे, वाहक यशवंत बालाजी कराड आदींचा जखमीत समावेश आहे. 

 

आर्थिक मदत   
एसटी महामंडळाकडून प्रवाशांना आर्थिक मदत करण्यात आली. ३४ प्रवाशांना ५०० ते २००० रुपये मदत देण्यात आली. प्रवाशांना जखमांच्या गंभीरतेवरून मदत ठरवण्यात आली असल्याचे आगारप्रमुख राठोड यांनी सांगितले. तसेच अपघातात बसचे सुमारे ४.५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती आगारप्रमुख विलास राठोड यांनी दिली.

 

 

पुढील स्लाईडवर वाचा जीप कारची धडक एक ठार...      

 

बातम्या आणखी आहेत...