आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३ महिलांचे दागिने, पर्स चोरीला, बस नेली ठाण्यात; पाऊण तास प्रवाशांची झडती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- तीन महिला प्रवाशांची दागिने व रोख रक्कम असलेल्या पर्स चोरीला गेल्याचा प्रकार माजलगाव बसस्थानकात घडला. महिलांनी बसमध्येच चौकशी केली. परंतु चोर सापडत नसल्याने, बस थेट माजलगाव शहर ठाण्यात दाखल झाली. पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांची पाऊण तास झाडाझडती घेतली, परंतु तपासणीत काहीच आढळून आले नाही. 


माजलगाव शहरातील बाजारात मोबाइल चोरासह बसस्थानकात चोरटे सक्रिय झाले आहेत. बाजारात कुणाचे न कुणाचे मोबाइल चोरीला जात असताना येथील बसस्थानकामध्येही महिलांच्या गळ्यातील दागिने काढून घेणे व पर्स मधील पैसे काढून घेणाऱ्या टोळीने सोमवारी ( दि.दोन) दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान उमरखेड - नगर गाडीतील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व पर्समधील पैसे व दुसऱ्या महिलेच्या पर्समधील बाळाचे चांदीचे वाळे व नगदी ५०० रुपये तसेच अन्य एका महिलेचे पैसे चोरीला गेल्याने गोंधळ उडाला. बसचालकाने बस माजलगाव शहर ठाण्यात नेेली. तेथे सर्व प्रवाशांची पोलिसांनी झाडाझडती घेतली पण चोर सापडला नाही महिला प्रवाशांची झडती घेताना महिला पोलिस कर्मचारी. 

बातम्या आणखी आहेत...