आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबीसी एजंटाचा हिंगोलीत आत्मदहनाचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - वसमत तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील केबीसी एजंटाने येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला वेळीच रोखले.   हिंगोली शहर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दत्तराव चव्हाण, (५५ वर्षे, रा. ब्राह्मणगाव ता. वसमत) असे या केबीसी एजंटाचे नाव आहे.


दत्तराव चव्हाण याने केबीसी  कंपनीमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यासाठी आणि चार पट रक्कम काही महिन्यांमध्येच मिळवून देण्यासाठी वसमत तालुक्यातील अनेक जणांकडून रक्कम घेतली होती. परंतु केबीसी कंपनी बंद पडून या कंपनी संचालकांवर गुन्हे दाखल झाले.  गुंतवणूकदार  चव्हाण यांच्या मागे रक्कम परत मिळण्यासाठी तगादा लावत होते.

 

त्यामुळे वैतागलेल्या  चव्हाण याने रविवारी दुपारी ३ च्या सुमारास येथील  पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर येऊन, मी कोणाचेही पैसे देऊ शकत नाही, मी पण या केबीसीमुळे बरबाद झालो, असे म्हणत अंगावर बाटलीतील पेट्रोल ओतून घेतले. परंतु पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतले. त्यानंतर हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयसिंग चंदेल व त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...