आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी, धारूर, वडवणीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी;मध्य महाराष्ट्रात 14 ते 15 मार्चदरम्यान पाऊस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिरसाळा/धारूर- रविवारी दुपारनंतर  परळी तालुक्यातील सिरसाळा, धारूर व वडवणी तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. सोसाट्याचा वारा व  मेघगर्जनेसह हा पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांसह आंब्याचे नुकसान झाले.  कापूस वेचणीवरही परिणाम झाला. धारूर शहरासह परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वडवणी तालुक्यातील काही भागात सरी कोसळल्या. दरम्यान, रविवारी सायंकाळी परभणी जिल्ह्याच्या काही भागात सरी कोसळल्या. शहरात विजांचा कडकडाट व वादळी वारे सुरू होते.

 

मध्य महाराष्ट्रात १४ ते १५ मार्चदरम्यान पाऊस
मध्य महाराष्ट्रामध्ये दिवसभर अंशत: ढगाळ वातावरण असून आगामी दोन ते तीन दिवस यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या पश्चिमेकडे एक चक्रवात निर्माण होत असून दोन दिवसांत चक्रीय कमी दाबाचे क्षेत्रात रूपांतर होण्याचे चित्र आहे. पश्चिमेला उत्तर दिशेला अरबी समुद्राच्या दिशेला १४ आणि १५  मार्चदरम्यान सरकण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ भागात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...