आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचाराचा प्रयत्न: तरुणाविरोधात गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला औरंगाबादला पळवून नेल्यानंतर तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना २१ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी सोमवारी शिवाजीनगर पोलिसांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


बीड शहरातील १७ वर्षीय विद्यार्थिनी येथीलच एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. २१ एप्रिल रोजी आसेफनगर भागातील शेख सोहेल इलियास या तरुणाने तिला जबरदस्तीने बसस्थानकात येण्यास भाग पाडले. त्याठिकाणी तिच्या तोंडावर हातरुमाल  लावून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले. यानंतर तिला  औरंगाबादेत नेऊन नातेवाइकाच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये ठेवण्यात आले. 


या दरम्यान,  तिची छेड काढून  जबरदस्तीचा प्रयत्न करण्यात आला.  माझ्याशी लग्न कर असा म्हणत तिच्यावर दबाव आणला गेला. २२ सकाळी तरुणीला बीड बसस्थानकावर आणून सोडण्यात आले. यानंतर तरुणीने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. साेमवारी पीडित मुलीच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून सोहेल इलियास शेख याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याच्याराच्या घटनांत वाढ झाल्याने जनसामान्यांत संतापाची लाट उसळत आहे. कठुआ आणि उन्नाव येथील घटनांनंतर महिलांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

 

अभियंता म्हणून करत होता बतावणी

दरम्यान, शेख सोहेल याने आपण अभियंता असल्याची बतावणी करून तरुणीला फसवले असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. त्याने आणखी काही तरुणींना फसवले आहे का, याचीही पोलिस चौकशी करत आहेत.

 

तरुण फरार
या प्रकारातील तरुण फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मोबाइल लोकेशनसह इतर माहितीच्या आधारावरून तपास सुरू आहे.

- सलीम पठाण, सहायक पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर ठाणे

बातम्या आणखी आहेत...