आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाब विचारला म्हणून धारदार हत्याराने युवकाचा खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी/जालना- माझ्या अंगावर पिशवी का उगारली असा जाब विचारणाऱ्या युवकाचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना आष्टी (ता.परतूर) येथे घडली. कृष्णा नरहरी कांदे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरातील ही खुनाची सातवी घटना घडली आहे.


रायगव्हाण येथील कृष्णा नरहरी कांदे (२०) हा शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बसस्टॉपजवळील किराणा दुकानासमोर उभा होता. त्याच वेळी आरोपी राजेभाऊ आश्रोबा कडपे (३३, रायगव्हाण, ता. परतूर) हा शेताकडे निघाला होता. त्याच्या हातातील पिशवीत जेवणाचा डबा होता. त्याच वेळी राजेभाऊ कडपेने आपल्या हातातील पिशवी कृष्णा कांदेवर उगारली. त्या वेळी पिशवी का उगारतो म्हणून त्यास जाब विचारला. त्यामुळे आरोपी राजेभाऊ कडपेने आपल्या खिशातील चाकू काढून कृष्णा कांदेच्या पोटावर वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने कृष्णा कांदेला जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रंधावणीबाई नरहरी कांदे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. 


शहरात सोमवारी नाकेबंदी 
गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांमध्ये खून करताना प्रामुख्याने धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला. जालना शहरातही गेल्या आठ दिवसांत दोन युवकांचे खून झाले. या दोन्ही घटनांमध्येही धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी सोमवारी सायंकाळी शहरात नाकेबंदी केली त्या वेळीही तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले होते. 
खुनाच्या घटनेनंतर घटनास्थळाची पाहणी करताना आष्टी ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी.