आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेत पैसे ठेवले तर नीरव मोदी नेतो, घरी ठेवले तर नरेंद्र मोदी आयटीकडे पाठवतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - भारतीय कामगार सेना वीज युनिटच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सूर उमटले. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थित झालेल्या या महाअधिवेशनात   कामगार सेनेचे अध्यक्ष आ.सूर्यकांत महाडिक यांनी  मोदी हे कामगारांचे दुष्मन आहेत. ते कामगारविरोधी धोरणे राबवत अाहेत. बँकेत पैसे ठेवले तर नीरव मोदी नेतो तर घरात ठेवले तर नरेंद्र मोदी  आयटी विभागाला पाठवतात, अशी टीका केली. 


दरम्यान, या अधिवेशनात महावितरण कंपनीचे  खासगीकरण थांबवावे, वीज कर्मचाऱ्यांना  पेन्शन योजना लागू करावी, यासह सहा महत्त्वपूर्ण ठरावही पारित करण्यात आले. 
महाअधिवेशनाचे उद्घाटन अक्षदा मंगल कार्यालयात शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कामगार सेनेचे अध्यक्ष आ.सूर्यकांत महाडिक होते. वीज युनिट कामगार सेनेचे कार्याध्यक्ष राजन भानुशाली, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हा प्रमुख संजय कच्छवे, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती. निमंत्रक व स्वागताध्यक्ष आ.डॉ. राहुल पाटील होते. 


 निमंत्रक  डॉ. पाटील यांनी वीज कामगारांच्या प्रश्नावर आगामी काळात अधिक आक्रमक भूमिका घेऊन त्यांचे प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाही दिली.    
 

मोदी कामगारांचे दुष्मन

देशात मोदी सरकार हे कामगारविरोधी धोरणे राबवू लागले आहे. त्यामुळे   नरेंद्र मोदीच कामगारांचे खरे दुष्मन आहेत. शंभर कामगार असणारी कंपनी बंद करण्याचा अधिकार मालकाला दिला जात आहे. यातून कामगारांना संपवण्याचाच घाट घातला जात आहे, असा आरोप  आ.  महाडिक यांनी  केला.  


स्वबळावर सत्ता आणायचीय  ; कामगारांच्या विरोधातील मोदी सरकारच्या विरोधात आता कामगारांनाच एकत्र यावे लागणार आहे. आगामी काळात कामगारांचे संघटन मजबूत करून त्यांच्या पगारवाढीच्या व पेन्शनच्या प्रश्नावर लढा उभा करावा लागणार आहे. त्यासाठी भाजपविरोधात सर्व कामगारांनी एकत्र यावे व शिवसेनेला स्वबळावर सत्ता आणण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन खा. खैरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...