आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत साडी सेंटर आगीच्या भक्षस्थानी; तीन तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्‍यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत सुभाषरोडवर असलेल्या कलानिकेतन साडी सेंटर या प्रसिद्ध दुकानास शुक्रवारी (दि.१६) पहाटे तीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत दुकानातील सर्व साड्या जळून खाक झाल्या. तीन मजली असलेल्या या दुकानातील इतरही सर्व कपडे जळाले. तब्बल तीन तासाच्या परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले.   सुभाष रोडवर जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार यांचे तीन मजली कलानिकेतन या नावाने कापड दुकान असून तळमजल्यावर शूटिंग शर्टिंगचे तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर साड्यांचे शोरूम आहे. गुरुवारी रात्री  नऊच्या सुमारास दुकाने बंद करून श्री.वट्टमवार घरी गेले होते. पहाटे तीनच्या सुमारास दुकानाच्या वरच्या मजल्यावर आग लागली. यामध्ये दोन्ही मजल्यावरील किमती साड्या जळून खाक झाल्या. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाला दुकानास आग लागली असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने दुकानमालक वट्टमवारांसह अग्निशमन दलास दूरध्वनीवरून या प्रकाराची माहिती दिली. तातडीने अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.