आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ATM मधील अजब प्रकाराने नागरिकांना मिळाला क्षणिक गजब आनंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- निलंगा तालुक्यातील निटूरच्या मधल्या एका खासगी कंपनीच्या एटीएमवर रात्री अजब प्रकार घडला. मात्र, या अजब प्रकारामुळे नागरिकांचा चांगला फायदा झाला. पण तो आनंद क्षणिकच होता.

 

 

येथील एका खाजगी कंपनीच्या एटीएममध्ये 100 रुपयांची नोट काढायला बटन दाबल्यावर 500 रुपयांची नोट बाहेर येत होती. विशेष म्हणजे एटीएमच्या स्लीपवर 100 रुपये खात्यातून कमी झाल्याची नोंद होत होती. हा प्रकार लक्षात आल्यावर अनेकांनी या एटीएमवर गर्दी करून पैसे काढले. सुमारे दोन ते तीन लाख रुपयांची रोकड काढून झाल्यावर एटीएम कंपनीचे अधिकारी आणि पोलिस दाखल झाले. दरम्यान, ज्या खात्यातून पैसे गेले त्याची नोंद त्या त्या बँकांमध्ये होत असते. त्यामुळे बँकांना असे पैसे वसूल करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे गावकऱ्यांचा हा आनंद क्षणिकच ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...