आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग 13 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ; परभणीत पाॅवर पेट्रोल 90 रुपयांवर पोहाेचले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी -   परभणीत शनिवारी रेग्युलर पेट्रोल ८७ रुपये ४६ पैसे, पॉवर पेट्रोल ९० रुपये ४० पैसे तर डिझेल ७३ रुपये ८६ पैसे प्रतिलिटरवर पोहोचले. आतापर्यंत परभणीतील इंधनाचे हे दर सर्वाधिक ठरले असून काही दिवसांत हे दर शंभरी गाठतील की काय, अशी भीती सर्वसामान्यांत व्यक्त होत आहे. 


  /> परभणीसारख्या अाडवळणावरील जिल्ह्यात इंधनाचे दर मुळातच पहिल्यापासून वाढीव राहिलेले आहेत. त्यामागील कारणेही स्पष्ट आहेत. परभणीतील काही पंपधारकांना सोलापूर डेपोमधून म्हणजे २५० किमी, काही पंपधारकांना मनमाडहून म्हणजे ३५० किमीवरून इंधनाचा पुरवठा होतो. डेपोमधील बेसिक रेट एक असले तरी पंपधारकांकडून वाहतुकीचा म्हणजे येण्या-जाण्याचा खर्च बेसिक किमतीत लावला जात असल्यामुळे त्या वाढीव दराचा फटका वाहनधारकांना बसत आहे. परभणीच्या तुलनेत जालन्यात इंधन दर कमी आहेत. परभणीच्या तुलनेत औरंगाबादच्या इंधनाच्या दरात सरासरी एक रुपयाचा फरक आहे. त्याउलट परभणीच्या तुलनेत देगलूर किंवा नांदेडचे दर एक ते दीड रुपयांनी जास्त आहेत.

बातम्या आणखी आहेत...