आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस भरती रॅकेट; आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - नांदेड पोलिस दलात भरतीसाठी लेखी परीक्षेत फेरफार करत उत्तरपत्रिका बदलणाऱ्या रॅकेटमधील अटकेत असलेल्या १२ जणांना  न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.   


नांदेड जिल्हा पोलिस दलात पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यादरम्यान, पेपर तपासणीचे काम पुणे येथील एसएसजी या सॉफ्टवेअर कंपनीला दिले होते. याप्रकरणाचा मास्टर माईंड नामदेव ढाकणे (आयआरबी, पोहेकॉ, औरंगाबाद) याने एसएसबीचे कर्मचारी शिरीष अवधूत, स्वप्नील   साळुंके व प्रवीण भटकर यांना हाताशी धरून  मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून प्रत्येकी साडेसात लाख रुपये घेऊन लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिका उमेदवारांना कोऱ्या सोडायला लावून नंतर उत्तरे लिहिली होती.

बातम्या आणखी आहेत...